कोरोनाग्रस्त रूग्ण फुटपाथवर तळमळला | Kalyan Dombivli Municipal Corporation | Covid 19

2021-09-13 108

रूग्णालयातून पळालेल्या कोरोना बाधीत रूग्णाला फुटपाथवर तडफडावं लागलं. शेवटी त्याला दवाखान्यात दाखल केलं पण तो पर्यंत त्याचा प्राण गेला होता. हा दुर्दैवी प्रकार घडलाय डोंबीवलीत.
शास्त्री नगर रूग्णालयातला हा प्रकार... सदर तरूण रूग्णालयाच्या आयसीयुमध्ये दाखल होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. पण आयसीयुमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्टाफ व्यस्त असतानाच हा रूग्ण पळून गेला, अशी माहिती रूग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉक्टर सुहासिनी बडेकर यांनी दिली. सदर रूग्ण हा रूग्णालयातून पळून तर गेला पण त्याला फार लांब जाता आलं नाही. तो रूग्णालयाच्याच समोरच्या फुटपाथवर तळमळत होता. स्थानिक नागरिकांनी त्याची अवस्था पाहिली आणि याची माहिती रूग्णालयाच्या प्रशासनाला दिली. त्याला तीन तासानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनी कोरोना बाधितांची अवस्था अत्यंत दयनीय असून रूग्णालयं कोरोना बाधितांच्या उपचारात कमी पडत असल्याचं स्पष्ट झालंय. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कित्येक पटींनी वाढला असून शासनाची व्यस्था कल्याण डोंबीवली किंवा ठाण्यातील परिस्थिती हाताळण्यात सक्षम नाही, हेच यावरून दिसून येतं. सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

#lokmat #KalyanDombivli #Coronavirus #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat